Tuesday, 6 September 2011

भिजपाऊस

भिजपाऊस 

      भिजपाऊस ....गेले काही दिवस हा शब्द माझ्या मनात येरझारा घालतो आहे. मातीत निजलेल्या बियांना आपल्या हळुवार स्पर्शाने  जागवणारा ....त्यांच्यातल्या सर्जनशक्तीची जाणीव करून देणारा असा हा पाऊस...! तो मुसळधार  पावसासारखा धसमुसळा नाही...आपल्याबरोबर सगळं धुऊन नेणारा नाही..तर, निसर्गाच्या हिरव्या चमत्काराला साद घालणारा ....चैतन्याला मूर्तरूप देणारा आहे. तो नसता तर....जमिनीत पहुडलेलं ते बीज, हिरवंगार रोप बनून वर आलं असतं का?...त्याच्यात दडलेली निर्मितीक्षमता त्याच्या कधी लक्षात तरी आली असती का?
          हा  भिजपाऊस  तुमच्या-माझ्या आयुष्यातही बरसत असतो ....फक्त तो आल्याचं आपल्याला कळायला हवं! त्यासाठी मनाची कवाडं कायम खुली ठेवायला हवीत ....तो बहुरूपी आहे. कधी मित्र बनून, तर कधी सहकारी बनून तर कधी एखाद्या प्रसंगाच्या रुपात आपल्या आयुष्यात येतो...अगदी काही क्षणासाठीचं त्याचं येणंही मनात निद्रिस्त असलेल्या अनेक कल्पनांना जागवतं...शब्दरूप देतं...कधी कधी विश्वास बसू नये इतकं सुंदर हातून लिहून होतं...अर्थात, लिहिणारे जरी आपण असलो तरी 'लिहविता' तो असतो....आपल्या मनाच्या अंगणात बरसून गेलेला भिजपाऊस!
         अशा अनेक सरी आतापर्यंत बरसून गेल्या...त्यातल्या काहींनी लिहितं ठेवलं....काही वेळा भिजूनही मी कोरडीच राहिले...त्यातलंच 'काही' तुमच्याबरोबर वाटून घ्यावं म्हणून इथे आले आहे....'त्याच्या'बद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या ब्लॉग नावही  भिजपाऊस देते आहे....कृतज्ञता व्यक्त करण्याचा मला सुचलेला हा एक मार्ग!
...अश्विनी

8 comments:

 1. Welcome to the Blog-World and Best wishes for expressing and sharing!

  ReplyDelete
 2. नाव छान आहे! तुझ्या मनातल्या पावसाच्या सरींमध्ये आम्हालाही भिजायला आवडेल!
  पुढच्या सरीची वाट पाहात्ये.

  ReplyDelete
 3. अभिनंदन, लवकरच काही वाचायला मिळेल अशी आशा करते.
  ' भिजपाउस ' नाव छान आहे, भिजलेल्या बी ला कोंब फुटल्यावर रोपाला फुले यायला कोवळे ऊन सुद्धा लागते.

  ReplyDelete
 4. अश्विनी!खूपच छान बरं का!!!!

  ReplyDelete
 5. helo, very nice name.i dont have devnagri lipi on my key board but soon i will get. till then kindly allow me to to use english and roman hinding/marathi. the name itself shows that - " tuchhya mana chi dharti farch urvar aahe." quite inovative and meaningfull name. my congratulations.

  ReplyDelete
 6. मामी ......!!!!! भारी ....:) :) अगदी दुसऱ्या मजल्यावरून कोणीतरी छान तलम कापडाची ओली चिंब ओढणी झटकली तर खाली उभ्या असलेल्या माणसाला कसे मस्त वाटेल ....अगदी तस्सच वाटतं मला भिजपावसात उभे राहून ...My favourite..:)Cheers

  ReplyDelete
 7. वा! छान. निसर्गाचे विभ्रम कवितेत उतरवणारी, व्यवहारातील लहान-सहान अनुभव लेखात मांडून विचार करायला भाग पाडणारी माझी मैत्रिण मला परत भेटली या नव्या माध्यमातून! मनापासून धन्यवाद. अशीच लिहित रहा.

  ReplyDelete
 8. Hi Aswini !!
  He mhanje apan ekhadya nivant kshani kahi mojkya mitra maitrini barobar dongarmathyawar asalelya devlat sabhamandapat chaan savlit basun gappa kelya sarkha watata.
  This comes as a catalyst for my dormant creativity, my wish to express reclusive thoughts...... Bhijpaus...... Ekhadya niragas lahan bala sarakha bhasata. Rain in its so many avatars.... Sun shining in so many wonderful ways... Nisargamule tar kadhi kadhi bhavtalchya mansan mule apan vichar karto , shevati Nisrga javalach jaun expressive hoto..this is my invisible line between our Living world and surreal world... Like no man's land.. where you can be just your self... Paradise..
  Keep up.. slowly I will journey thru your world of words.... keep pumping something solid..

  ReplyDelete